banner https://www.highratecpm.com/n1ckmsmz?key=1efe18365b92e234714467dfb975f080 "माती परिक्षणाचे महत्त्व: कसे करावे व योग्य पद्धती" मुख्य सामग्रीवर वगळा

"महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री: राष्ट्रीय नेत्यांचे जीवन, कार्य आणि योगदान".

"माती परिक्षणाचे महत्त्व: कसे करावे व योग्य पद्धती"

माती परीक्षण

सामान्यतः मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला तरी चालतो. परंतु वर्षातून दोन ते तीन वेळा पिके घेतल्यास मातीचा नमुना दरवर्षी घेणे जरुरीचे असते. नत्र खतांचे जमिनीतील प्रमाण दरवर्षाला बदलत असल्याने नत्राचे प्रमाण तपासण्यासाठी मातीचा नमुना दरवर्षी घ्यावा.




नमुना कधी घ्यावा?

खरीप पीक काढल्यानंतर लगेच किंवा एप्रिल—मे महिन्यामध्ये मातीचे नमुने घ्यावेत. पिकाला सेंद्रीय अथवा रासायनिक खत घातल्यावर तीन महिन्यांच्या आत मातीचा नमुना घेऊ नये. नमुना ओला असल्यास सावलीत वाळवून नंतर पिशवीत भरावा. 


प्रातिनिधिक नमुना कसा घ्यावा?

१. मातीचा नमुना घेताना जमिनीचे क्षेत्र विस्तार, स्थान, निचरा, रंग, पोत, घेण्यात येणारी पिके व जलसिंचन यांचा प्रामुख्याने विचार करावा. 


२. नमुना घेताना शेताचे भाग पाडावेत. अर्धा ते दोन हेक्टरपर्यंत भागातील एक असे वेगवेगळे नमुने घ्यावेत. उदा. चोपण जमीन, कोरडवाहू जमीन, पाणथळ जमीन, उतारावरची जमीन याप्रमाणे प्रत्येक जमिनीचे वेगवेगळे नमुने घ्यावेत.


 . नमुना काढण्यासाठी टिकाव, फावडे, खुरपे किंवा

ऑगर, घमेली, पॉलिथिन किंवा ताडपत्रीचा तुकडा, गोणपाट, कापडी पिशवी या वस्तूंची जरुरी असते. 


४. खालील जागेतून मातीचा नमुना घेऊ नये. अ) पाण्याच्या पाटाजवळील जागा

ब) विहिरीजवळील जागा

क) जनावरे बसण्याच्या जागा

ड) खत आणि कचरा टाकण्याच्या जागा

इ) दलदलीची जागा

फ) बांध व झाडांखालील जागा


.पाच ते सहा वळणे असलेल्या रेषा काढाव्यात. या रेषा जमिनीच्या लांबी-रुंदीप्रमाणे कमी-जास्त अंतरावर असाव्यात. प्रत्येक वळणावर टिकाव किंवा खुरप्याने खुणा कराव्यात. खुणा केलेल्या जमिनीवरील सर्व पालापाचोळा, तण काढून टाकावे. त्या ठिकाणी २२.५ सें.मी. ( वीतभर ) चौकोनी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील सर्व माती हाताने अगर खुरप्याने काढून टाकावी. खड्डयाचा आकार साधारणपणे इंग्रजी 'व्ही' अक्षराप्रमाणे असावा. खड्डयाच्या एका बाजूची साधारण ४ सें.मी. जाडीची माती खुरप्याने तासून घ्यावी व ती माती घमेल्यात गोळा करावी. अशा पद्धतीने १० ते १२ ठिकाणांहून गोळा केलेली माती पॉलिथिनच्या / ताडपत्रीच्या तुकड्यावर पसरुन चांगली मिसळावी. मातीत असणारे खडे व वनस्पतीची मुळे काढून टाकावी आणि मोठी ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर त्याचे चार समान भाग पाडून समोरासमोरचे दोन भाग काढून टाकावेत. शेवटी दोन ओंजळीएवढी किंवा अर्धा किलो माती शिल्लक राहीपर्यंत ही क्रिया करावी. हा मातीचा नमुना स्वच्छ कापडाच्या पिशवीत भरावा. 


. विविध पिकांकरिता वेगवेगळ्या खोलीचे नमुने घ्यावेत. उदा. हंगामी पिके ( भात, नागली, भुईमूग इत्यादी) : २० ते २५ सें.मी.; बागायती पिके (ऊस, केळी इत्यादी) : ३० ते ४० सें.मी.; फळबाग पिके (उदा. आंबा, काजू, नारळ, सुपारी इ.) : ६० सें.मी.


. मातीच्या नमुन्याबरोबर खालील माहिती पाठवावी. अ) नमुना क्रमांक

ब) नमुना घेतल्याची तारीख

क) शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव

ड) शेतकऱ्याचा संपूर्ण पत्ता

इ) नमुना किती खोलीपर्यंत घेतला त्याची माहिती फ) जमिनीचा उतार

ग) जमिनीचा निचरा

ह) पुढील हंगामात घ्यावयाची पिके

याप्रमाणे माहिती भरुन झाल्यावर मातीचा नमुना बंद करुन जवळच्या माती परिक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा. महाराष्ट्र शासनाच्या माती परिक्षण प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्यात आहेत.

प्रयोगशाळेत विश्लेषण:

तपासणी: प्रयोगशाळेत मातीतील पोषण घटक, पीएच पातळी, सेंद्रिय कार्बन, आणि इतर सूक्ष्म पोषक घटक तपासले जातात.

तंत्रज्ञानाचा वापर: इतर विश्लेषणांसाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर केला जातो.

अहवाल तयार करणे:

निष्कर्ष: प्रयोगशाळा मातीतील पोषण घटकांचे प्रमाण आणि इतर बाबींवर आधारित एक अहवाल तयार करते.

सल्ला: अहवालावर आधारित, शेतकऱ्यांना कोणती पिके घेणे, कोणत्या प्रकारचे आणि किती प्रमाणात खत वापरावे याचे सल्ले दिले जातात.


मातीचा पोत पाहण्याची 'फील' पद्धत


हाताचा अंगठा व तर्जनीमध्ये माती दाबली असता स्पर्शज्ञानाने त्यातील वाळू, पोयटा आणि मृत्तिका यांचे प्रमाण अंदाजाने ओळखणे म्हणजेच जमिनीचा पोत ओळखणे होय. या पद्धतीला 'फील' पद्धत म्हणतात. ओलसर माती घ्यावी व ती दोन बोटांमध्ये थोड्याशा ताकदीने वळावी. मातीमध्ये मृत्तिका कणांचे प्रमाण जास्त असल्यास मातीचा आकार लांबट होतो. त्याला चिकटपणासुद्धा जास्त असतो. वाळूचे प्रमाण जास्त असल्यास हाताला खरखरीतपणा जाणवतो. पोयट्याचे प्रमाण जास्त असल्यास पिठूळ अथवा गुळगुळीतपणा जाणवतो. परंतु त्याचा चिकटपणा मृत्तिकाकणापेक्षा कमी व वालुकणापेक्षा जास्त असतो. या पद्धतीने शेतातसुद्धा जमिनीचा पोत ओळखता येतो.


माती परीक्षणाचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे शेती अधिक प्रभावी व उत्पादनक्षम होऊ शकते. काही महत्त्वाचे फायदे असे आहेत:


मातीतील पोषण घटकांची माहिती: माती परीक्षणाद्वारे मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, आणि इतर सूक्ष्म पोषण घटकांचे प्रमाण कळते, ज्यामुळे योग्य खतांचा वापर करता येतो.


खतांचा योग्य वापर: माती परीक्षणाच्या अहवालावर आधारित शेतकरी आवश्यकतेनुसार खतांचा वापर करू शकतात, ज्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो.


पीक पद्धतीचा सुधारणा: माती परीक्षणामुळे मातीच्या प्रकारानुसार कोणत्या पिकाची लागवड करावी याचे ज्ञान मिळते, ज्यामुळे उत्पादन सुधारते.


मातीच्या आरोग्याची जाणीव: माती परीक्षणामुळे मातीतील सेंद्रिय घटक आणि पीएच पातळीची माहिती मिळते, ज्यामुळे मातीची गुणवत्ता टिकवण्यास मदत होते.


पर्यावरणाचे संरक्षण: योग्य प्रमाणात खतांचा वापर केल्याने पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम कमी होतो.


जल संसाधनांची बचत: माती परीक्षणाद्वारे पाण्याची आवश्यकता आणि व्यवस्थापन योग्य प्रकारे करता येते, ज्यामुळे पाण्याची बचत होते.


हे फायदे माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून उपयुक्त ठरतात.





या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"गुरु-पुष्य योग: शुभ मुहूर्त, महत्व, आणि फायदे"

"गुरु-पुष्य योग हा एक अतिशय शुभ योग आहे ज्यामध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जाणून घ्या या योगाचे महत्व, तिथी, आणि त्याचे फायदे." गुरु-पुष्य योगगुरु-पुष्य योग 2024गुरु-पुष्य योग महत्वशुभ मुहूर्तगुरु-पुष्य योग फायदेगुरु पुष्य योगात काय करावे गुरु-पुष्य योग म्हणजे काय? गुरु-पुष्य योग हा भारतीय ज्योतिषशास्त्रात एक अत्यंत शुभ योग मानला जातो. हा योग गुरुवारी आणि पुष्य नक्षत्राच्या संयोगाने तयार होतो. गुरुवार हा बृहस्पति ग्रहाचा दिवस आहे आणि पुष्य नक्षत्राला सर्वात शुभ नक्षत्रांपैकी एक मानले जाते. या दोन शुभ घटकांचा एकत्र योग निर्माण झाल्यावर, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते. गुरु-पुष्य योगाचे महत्व: गुरु-पुष्य योग विशेषतः विवाह, घर खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात, गृहरचना, किंवा कोणतेही धार्मिक कार्य करण्यासाठी उत्तम मानला जातो. या योगाच्या दिवशी केलेले कार्य यशस्वी होते, कारण बृहस्पति ग्रह हा ज्ञान, समृद्धी आणि धर्माचे प्रतीक आहे. गुरु-पुष्य योगाचा उपयोग: श्रीगणेश पूजन: या दिवशी श्रीगणेशाचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले

नवरात्रि उत्सव: इतिहास, महत्त्व, आणि परंपरा - भारतीय संस्कृतीचा सण

नवरात्रि उत्सव: इतिहास, महत्त्व आणि परंपरा #नवरात्रि #नवरात्रि2024 #नवरात्रिउत्सव #देवीउपासना #भारतीयसंस्कृती #सण #शक्तीउपासना #garba #डांडिया नवरात्रि हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेने साजरा केला जाणारा सण आहे. या सणात देवी दुर्गेच्या विविध रूपांची उपासना केली जाते. नवरात्रिचा अर्थ 'नऊ रात्री', या नऊ दिवसांच्या सणात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. देवी शक्तीची उपासना आणि दुष्टांचा नाश करण्याचा संदेश देणारा हा सण विशेष महत्त्वाचा आहे. नवरात्रि उत्सव, नवरात्रि इतिहास, देवी उपासना, नवरात्रि परंपरा, शक्ती उपासना, नवरात्रि पूजा, नवरात्रि सण नवरात्रिचा इतिहास: नवरात्रि उत्सवाचा इतिहास फार पुरातन आहे आणि तो मुख्यतः देवी दुर्गेच्या उपासनेशी जोडलेला आहे. या उत्सवाचा उगम महाभारत काळात झाला, असे मानले जाते. रामायणात प्रभू रामांनी रावणाचा पराभव करण्यासाठी देवीची आराधना केली होती, असे म्हणतात. त्यानंतर देवीने दुष्टांचा नाश केला आणि सत्याचा विजय झाला. या ऐतिहासिक घटनेचा स्मरण म्हणून नवरात्रि साज

"महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री: राष्ट्रीय नेत्यांचे जीवन, कार्य आणि योगदान".

"महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनप्रवासाचे वर्णन. #लाल_बहादुर_शास्त्री #स्वातंत्र्यसंग्राम #जय_जवान_जय_किसान #गांधी_जयंती #शास्त्री_जयंती #अहिंसा #सत्याग्रह #राष्ट्रनेते महात्मा गांधींचे जीवन आणि योगदान महात्मा गांधींचे जन्म आणि शिक्षण: मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते, त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर, गुजरातमध्ये झाला. त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आणि वकील झाले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत अहिंसेचे तत्त्वज्ञान वापरून महत्त्वपूर्ण योगदान दिले. महात्मा गांधी जीवन चरित्रलाल बहादुर शास्त्री जीवनगांधीजीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानजय जवान जय किसान घोषवाक्य2 ऑक्टोबर राष्ट्रीय महत्त्वगांधी आणि शास्त्री जयंती 2024महात्मा गांधी अहिंसालाल बहादुर शास्त्री साधेपण अहिंसा आणि सत्याग्रहाची संकल्पना: गांधीजींनी 'अहिंसा' आणि 'सत्याग्रह' या तत्त्वांद्वारे ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला. चंपारण, खेड़ा सत्याग्रह, असहकार आंदोलन, खादी चळवळ, दांडी मार्च अशा महत्त्वाच्या घटना गांधीजींच्या नेतृत्वाखाली पार प

ukadiche modak ani talalele modak- paramparik godachi khasiyat (उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक)

मोदक कसे बनवायचे? Ukadiche modak गणपती बाप्पाच्या नैवेद्याचा प्रमुख पदार्थ म्हणजे मोदक. हे गोड पदार्थ गणपतीला अत्यंत प्रिय आहेत. मोदक दोन प्रकारे बनवता येतात: उकडीचे मोदक आणि तळलेले मोदक. इथे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे सांगितले आहे. साहित्य: उकडीसाठी: १ कप तांदळाचं पीठ १ ¼ कप पाणी १ चमचा तूप चिमूटभर मीठ सारणासाठी: १ कप किसलेला नारळ १ कप गूळ (किसलेला किंवा बारीक तुकडे केलेला) २ चमचे तूप १ चमचा खसखस (पर्यायी) २ चमचे सुकामेवा (काजू, बदाम, पिस्ते) बारीक केलेले १ चमचा वेलची पूड कृती: 1. उकड बनवणे: एका पातेल्यात १ ¼ कप पाणी उकळा. त्यात तूप आणि चिमूटभर मीठ घाला.पाणी उकळल्यावर त्यात तांदळाचं पीठ हळूहळू घालून सतत ढवळा.पीठ आणि पाणी एकत्र झाल्यावर गॅस बंद करा आणि भांडे झाकून ठेवा.उकड थोडीशी गार झाल्यावर हातावर तूप लावून ती व्यवस्थित मळून घ्या. 2. सारण तयार करणे: एका कढईत तूप गरम करा.त्यात खसखस घालून काही सेकंद परता.आता किसलेला नारळ आणि गूळ घाला. गूळ वितळेपर्यंत मंद आचेवर परतत रहा.गूळ वितळल्यावर मिश्रणाला वेलची पूड आणि सुकामेवा घालून नीट मिक्स करा.मिश्रण कोरडे होईपर्यंत परता आणि नंतर गॅस बंद करून

"साजूक साखरेचा गोडवा,खोबर्‍याचा स्वाद: घरच्या घरी झटपट बनवा स्वादिष्ट नारळाच्या वड्या!”

नारळाच्या वड्या – पारंपारिक आणि स्वादिष्ट नारळाच्या वड्या हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक आणि लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारा गोड पदार्थ आहे. या वड्या केवळ चवीला अप्रतिम नसतात, तर त्या बनवायला सोप्या आणि घरच्या घरी सहज तयार करता येण्यासारख्या आहेत. चला तर मग, आपण आज घरच्या घरी नारळाच्या वड्या कशा प्रकारे बनवायच्या ते शिकूया.    आवश्यक साहित्य: नरम नारळ खोवलेला - २ कप (साधारण २ मध्यम आकाराचे नारळ) साखर - १ ½ कप दूध - १ कप तूप - २ टेबलस्पून वेलची पूड - १ चमचा बदाम/पिस्ता कापलेले (ऐच्छिक) - सजावटीसाठी    कृती :   १.नारळाची तयारी : सर्वप्रथम, नारळ खोवून घ्या. घरगुती वड्यांसाठी साधारण २ कप नारळ आवश्यक आहे. नरम नारळ वापरण्यामुळे वड्यांना उत्कृष्ट चव मिळते.   २.पाक तयार करणे: एका जाड तळाच्या पातेल्यात खोवलेला नारळ आणि दूध एकत्र करा. हे मिश्रण मंद आचेवर उकळू द्या आणि चांगले ढवळत राहा. दूध कमी होऊन नारळाच्या मिश्रणात शोषून घेतले जाईल. यानंतर, त्यात साखर घाला आणि पुन्हा चांगले ढवळा. साखर वितळून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. मिश्रण ओल्या वाळूच्या सारखे होईपर्यंत हे शिजवणे गरजेचे आहे.    ३.